Notifications

ओबीसी आरक्षणाविरोधात उच्च न्यायालयात याचिका

By PCB Author

December 20, 2018

मुंबई, दि. २० (पीसीबी) – मराठा समाजाला दिलेल्या १६ टक्के आरक्षणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली  असताना, आता ओबीसी समाजाला दिलेल्या ३२ टक्के आरक्षणाला उच्च न्यायालयात   आव्हान देण्यात आले आहे.  याबाबत बाळासाहेब सराटे यांच्यावतीने  नवी जनहित याचिका  मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठापुढे आज (गुरुवारी)  सादर झाली. यावर ९ जानेवारी रोजी सुनावणी घेण्यात येणार  आहे.