Maharashtra

ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यास छगन भूजबळांचा विरोध

By PCB Author

November 17, 2018

मुंबई, दि. १७ (पीसीबी) – मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. पण ओबीसी समाजाच्या आरक्षणामधून ते आरक्षण नको. त्यासाठी सरकारने वेगळी उपाययोजना करावी. असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये केले आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे,  असे सर्वच पक्षाचे मत आहे. राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षणाचा निर्णय कसा घेतात त्यावर आमची पुढील दिशा ठरेल. सध्या त्यावर बोलण्यात अर्थ नाही असेही भुजबळ म्हणाले.