Maharashtra

ओढणीने हात बांधून प्रेमी युगुलाने नदीत उडी घेऊन केली आत्महत्या

By PCB Author

November 19, 2018

भंडारा, दि. १९ (पीसीबी) – प्रेमी युगुलाने एकमेकांच्या हातात हात घालून ते ओढणीने बांधून भंडारा शहराजवळ असलेल्या वैनगंगा नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

विशाल गणेश शेंडे (वय २०) आणि दीक्षा मारबते (वय २०) असे आत्महत्या केलेल्या प्रेमी युगुलांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल आणि दीक्षा हे दोघेही मावस भावंडे होती. यामुळे त्यांच्या प्रेमसंबंधांना आणि लग्नाला कुटुंबीयांचा विरोध असावा त्यामुळेच या दोघांनी आत्महत्या केली असावी असे बोलले जात आहे. हे दोघेही भंडाराजवळील जाव्हारानगर येथे राहत होते. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कारधा गावात वैनगंगा नदीच्या तीरावर त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसल्यावर काही स्थानिकांनी पोलिसांना याबाबतची माहिती देऊन दोघांचा मृतदेह नदी बाहेर काढला. तपासा दरम्यान दोघांजवळ सापडलेल्या मोबाइलच्या साहाय्याने त्यांची ओळख पटली. भंडारा पोलीस अधिक तपास करत आहेत.