Pune Gramin

ओझर्डे गावात दीड लाखाची घरफोडी

By PCB Author

May 19, 2022

मावळ ,दि. १९ (पीसीबी) – मावळ तालुक्यातील ओझर्डे गावात दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी एक लाख 55 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना बुधवारी (दि.18) दुपारी बारा वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

याप्रकरणी एका महिलेने बुधवारी (दि. 18) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. 16) दुपारी चार ते बुधवारी दुपारी बारा वाजताच्या दरम्यान फिर्यादी यांचे घर कुलूप लावून बंद होते. या कालावधीमध्ये चोरट्याने त्यांच्या सेफ्टी डोअर आणि आतील दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. बेडरूममधील लोखंडी कपाट उचकटून चोरट्यांनी एक लाख 5 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि पन्नास हजार रुपये रोख रक्कम असा एकूण एक लाख 55 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.