Chinchwad

“ओएलएक्स” वरुन दुचाकी विकेत देण्याच्या बहाण्याने हिंजवडीतील तरुणीला ३५ हजारांचा गंडा

By PCB Author

July 16, 2019

चिंचवड, दि. १६ (पीसीबी) – “ओएलएक्स” वरुन स्कुटी दुचाकी विकेत देण्याच्या बहाण्याने अज्ञाताने तरुणीला दुचाकी न देता ३५ हजारांचा गंडा घातला. ही घटना शुक्रवार (दि.१२ जुलै) हिंजवडी येथे घडली.

याप्रकरणी स्मिता कुमारी (वय २४, रा. फ्लॅट क्र. ३०३, रा. इवॉन होम्स, हिंजवडी फेज ३) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ९३५००५८३०६, ७०२७२५१२३५ आणि ९७७२३११७६६ या तीन मोबाईल नंबर धारकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी फिर्यादी स्मिता यांनी “ओएलएक्स” या ऑनलाईन सेकेंड हॅण्ड वस्तू विकणाऱ्या वेबसाईटवरुन एक स्कुटी दुचाकी खरेदी करण्याचे ठरवले. त्यांना एक दुचाकी पसंत देखील पडली. यावर त्यांनी त्या दुचाकी मालकाला ९३५००५८३०६, ७०२७२५१२३५ आणि ९७७२३११७६६ या तीन मोबाईल क्रमांकावर फोन केला. त्यानंतर व्यवहार ३५ हजारात ठरला स्मिताने ती रक्कम आरोपीच्या बँक खात्यात भरली. मात्र आरोपीने स्मिता यांना स्कुटी तर दिली नाहीच त्यांचे पैसे देखील परत केले नाही. हिंजवडी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.