ऑस्ट्रेलिया; पाणी जास्त पितात म्हणून दहा हजार उंटांची हत्या करण्यात येणार

0
1074

ऑस्ट्रेलिया, दि.९ (पीसीबी) – सध्या ऑस्ट्रेलियामधील वणवे ही जगभरामध्ये चर्चेत आहेत. एकीकडे वणव्यांबद्दल चर्चा असतानाच दुसरीकडे देशामधील काही भागांमधील दृष्काळही चर्चेत आहे. अशाच दृष्काळी भागामधील दहा हजार उंटांची हत्या करण्यात येणार आहे. विशेष प्रशिक्षण घेतलेले शिकारी हेलिकॉप्टरमधून उंटांना गोळ्या घालून त्यांना ठार करणार असल्याची माहिती समोर आली आहे. दृष्काळग्रस्त भागामध्ये आदिवास असणारे हे उंट गरजेपेक्षा अधिक प्रमाणात पाणी पीत असल्याने त्यांना ठार मारण्यात येणार आहे.

हे उंट मोठ्या संख्येने येतात आणि नळ तसेच साठवलेले पाणी पाऊन जातात अशी तक्रार येथील स्थानिक आदिवासी जमातीच्या लोकांनी सरकारकडे केली आहे.

स्थानिक म्हणतात… “उंट आमच्या अगदी एसीमधील पाणीही पितात. उंट एसीमधील पाणी पीत असल्याने आम्हाला अनेकदा उष्ण आणि अती उष्ण वातावरणामध्ये रहावे लागते,” असे एपीव्हायचे कार्यकारी सभासद असणारे मराती बाकेर यांनी ‘द ऑस्ट्रेलियन’ या वृत्तपत्राला सांगितले.