Pune

ऑल इंडिया शिवाजी मेमोरियल सोसायटीचे अभियांत्रिकी महाविद्यालयातील रक्तदान शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद

By PCB Author

October 03, 2018

पुणे, दि. ३ (पीसीबी) – पुण्यातील ऑल इंडिया शिवाजी मेमोरियल सोसायटीचे अभियांत्रिकी महाविद्यालयात, राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिराचे उदघाटन डॉ.माने उपसंचालक जन्म व मृत्यू नोंदणी विभाग महाराष्ट्र राज्य तसेच डॉ.पाटील उपसंचालक कुटुंब कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बोरम, एन.एस.एसचे कार्यक्रम अधिकारी डॉ.नाना शेजवळ, ससून विभागीय रक्तपेढीचे नयना मुंडे, देसले, जेष्ठ साहित्यीक मधु पोतदार आदी उपस्थित होते. रक्तदान हेच सर्व श्रेष्ठ दान आहे व निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन डॉ.पाटील यांनी यावेळी केले. तर, प्रत्येकाने आपल्या आयुष्यात समाजासाठी रक्तदान केले पाहिजे, विद्यार्थ्यांनी समाजातील लोकांसाठी रक्तदान केले पाहिजे, असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बोरमणे यांनी केले.