ऑलिंपिकवरती कोरोनाच सावट; ऑलिंपिक तालबद्ध जलतरण स्पर्धेची पात्रता फेरी आता ‘या’ महिन्यात होणार

0
298

टोकियो, दि.२८ (पीसीबी) : ऑलिंपिक स्पर्धेसाठी तालबद्ध जलतरण स्पर्धेची जपान येथे होणारी पात्रता फेरी मे महिन्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. जपानमधील करोना संसर्गाच्या वाढत्यापरिस्थितीमुळे हा निर्णय घेण्यात आळा आहे.

ही पात्रता फेरी मार्चमध्ये होणार होती. मात्र, ती पुढे ढकलण्यात आल्याचे सांगताना संयोजक आणि जागतिक जलतरण महासंघ यांनी आता १ ते ४ मे दरम्यान ही फेरी होईल असे जाहीर केले. त्याचवेळी या फेरीलाच टोकियो ऑलिंपिक स्पर्धा केंद्र चाचणीचा दर्जा दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

जपानमधील करोना संसर्गाची परिस्थिती गंभीर झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर यासगळ्या पार्श्वभूमीवर खेळाडूंसाठी सुरक्षित सुविधा उपलब्ध करणे देखिल कठिण असल्याचे संयोजकांनी म्हटले आहे. सध्या जपानमध्ये येण्यासाठी प्रवासी संख्येवर देखिल मर्यादा ठेवण्यात आल्या आहेत या कडेही संयोजकांनी लक्ष वेधले आहे.

जपानमधील परिस्थिती हाताबाहेर चालली असल्याचेही म्हटले जात आहे. जपानमध्ये सध्या करोनाची तिसरी लाट आली असून, परदेशांशाठी जपानच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. यानंतरही ऑलिंपिक पात्रता फेरीसाठी परदेशी स्पर्धकांनी येण्याची मान्यता देण्यात आली होती. मात्र, आता ती देखील रद्द करण्यात आल्याचे समजते.

यापूर्वी गेल्यावर्षी होणारे ऑलिंपिक करोनाच्या टाळेबंदीमुळे या वर्षी जुलैपर्यंत पुढ ढकलण्यात आले होते. मात्र, आता जपानमधील तिसऱ्या लाटेमुळे ऑलिंपिकच्या आयोजनास तेथील नागरिकांचा विरोध वाढत आहे. पण, जपान सरकार आणि ऑलिंपिक समिती स्पर्धेचे यशस्वी संयोजन करण्यावर ठाम आहेत.