Pimpri

ऑनलाइन व्हाट्सअपद्वारे मटका घेत होते; पोलिसांना समजताच…..

By PCB Author

July 01, 2021

पिंपरी, दि. 1 (पीसीबी): ऑनलाइन मटका खेळणाऱ्या चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 30) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास देहू फाटा, आळंदी येथे करण्यात आली.

इनायत अजिज शेख (वय 36, रा. संत तुकाराम नगर, भोसरी), हसन शेख, माऊली जगताप (दोघेही रा. देहू फाटा), बाळासाहेब तापकीर (रा. वडमुखवाडी, चऱ्होली), अशी आरोपींची नावे आहेत. पोलीस नाईक हेमंत महादेव आव्हाड यांनी या प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे मोबाईल फोनवर ऑनलाइन व्हाट्सअप द्वारे मटका घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करून आरोपींवर गुन्हा दाखल केला. तसेच मोबाईल फोन व रोख रक्कम असा एकूण 16 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.