Pimpri

ऑनलाइन मागवलेल्या चाकूच्या धाकाने डिलिव्हरी बॉयला लूटले

By PCB Author

April 18, 2021

तळेगाव दाभडे, दि.18 (पीसीबी) : ऑनलाईन माध्यमातून मागवलेल्या चाकूच्या धाकाने एका डिलिव्हरी बॉयला लुटले. ही घटना शनिवारी (दि. 17) दुपारी मुकाई चौक येथे घडली. विनोद लकुमन ललवाणी (वय 43, रा. तळेगाव दाभाडे) यांनी याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कुणाल सुभाषचंद्र वाल्मीकी (वय 21, रा. श्रीकृष्णनगर देहूरोड) आणि त्याच्या एका साथीदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कुणाल याने स्नॅपडील वरून ऑनलाईन माध्यमातून चाकू मागवला. चाकूचे पार्सल घेऊन फिर्यादी शनिवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास मुकाई चौकात आले. त्यावेळी आरोपीने रिक्षातून येऊन फिर्यादी यांना पार्सल मागितले. पार्सल उघडून त्यांना शिवीगाळ करत पार्सल मध्ये आलेल्या चाकूचा धाक दाखवून फिर्यादी यांच्याकडून 1हजार 950 रुपयांचा माल जबरदस्तीने चोरून नेला. पोलिसांनी आरोपी कुणाल याला अटक केली आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.