ऑक्‍सिजन कॅन्सट्रेटर व इतर उपकरणे होलसेल भावात विकण्याच्या बहाण्याने चार लाखांची फसवणूक

0
397

पिंपळे गुरव, दि. २२ (पीसीबी) – ऑक्‍सिजन कॅन्सट्रेटर व इतर उपकरणे होलसेल भावात देतो, असे सांगत एकाची चार लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. ही घटना 7 मे 2021 ते 21 जून 2021 या कालावधीत पिंपळे गुरव येथे ऑनलाईन घडली. याप्रकरणी नितिन भाऊसाहेब चव्हाण (वय 54, रा. जवळकर नगर, पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी रजत रबाणी (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रजत रबाणी याने त्याच्या इ-मेल आयडी वरून फिर्यादी चव्हाण यांना संपर्क साधला. तुम्हाला होलसेल भावात ऑक्‍सिजन कॅन्सट्रेटर व इतर उपकरणे देतो, असे सांगून फिर्यादी चव्हाण यांच्याकडून एनईएफटी द्वारे चार लाख सात हजार 998 रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर कोणतेही वैद्यकिय उपकरण न देता तसेच पैसे परत न देता फिर्यादी चव्हाण यांची फसवणूक केली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.