Desh

ऑक्सिजनचा पुरवठा खंडित झाल्यामुळे २६ रूग्णांना गमवावा लागला जीव; आरोग्यमंत्र्यांनी दिले तात्काळ चौकशीचे आदेश

By PCB Author

May 12, 2021

गोवा , दि.१२ (पीसीबी : कोरोना संकटाच्या वेळी बर्‍याच रूग्णांसाठी ऑक्सिजन खूप महत्वाचा असल्याचे सिद्ध झाले आहे आणि पुरवठा खंडीत झाल्यामुळे बर्‍याच रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. केवळ दिल्ली आणि उत्तर प्रदेशच नाही, तर इतरही अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्याने राज्यातील रुग्णांच्या जीव जाण्याला कारणीभूत ठरत आहे. गोव्यात मंगळवारी ऑक्सिजन पुरवठा खंडीत झाल्याने 4 तासात 26 रुग्णांचे प्राण गमावले.

गोव्यात आज 2 वाजल्यापासून 6 वाजेच्या दरम्यान ऑक्सिजनचा पुरवठा खंडित झाल्यामुळे किमान 26 रूग्णांना आपला जीव गमवावा लागला. मंगळवारी सकाळी फक्त 4 तासांत 26 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्याच्या आरोग्यमंत्री विश्वजित राणे म्हणाले की, या संपूर्ण घटनेची चौकशी झाली पाहिजे, उच्च न्यायालयही यासंदर्भात चौकशी करू शकेल.

गोव्यात जवळपास 50 मृत्यू झाले आहेत. गोवा मेडिकल कॉलेज (जीएमसी) रूग्णालयात मृत्यूची संख्या जवळपास 20 ते 30 च्या आसपास आहे. आज तिथे 26 मृत्यू झाले. ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्यामुळे असे होऊ शकते असे आरोग्यमंत्री म्हणतात. या घटनेवर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळे किंवा उशीर झाल्यामुळे असे घडले असे वाटत नाही. जिल्हा प्रशासनाने काल रात्री दोन ते पहाटे सहाच्या दरम्यान गोवा मेडिकल कॉलेजमध्ये ऑक्सिजनची कमतरता नोंदवून एसओएसमार्फत त्वरित याची माहिती देण्यास सांगितले.