‘ऑईल कंपन्या तुपाशी’

0
258

पुणे, दि.१७ (पीसीबी) : पाच राज्यांची निवडणूक प्रक्रिया सुरु असताना पेट्रोल डिझेल चे स्तब्ध असलेले भाव गेल्या अडीच महिन्यांपासून परत वाढू लागलेत. हे दर ऑईल कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूड तेलाच्या किमती व डाॅलरच्या किमती प्रमाणे ठरवतात तर बरोब्बर निवडणूक काळात दर कसे स्थिर राहतात कुणास ठाऊक. सध्या पेट्रोल डिझेल च्या वाढत असलेल्या किमती बघून मी तिन्ही सरकारी मालकीच्या कंपन्यांचे जाहीर झालेले 2020-21 या आर्थिक वर्षाचे Indian oil corporation या कंपनीने 2020-21 या आर्थिक वर्षात आधीच्या वर्षीच्या पेक्षा 1600 % नफा जास्त कमावला , ( 1313 crs to 21836 crs.) आणी भागधारकांना 120% लाभांश ही दिला .

BPCL या कंपनीने 2020-21 या आर्थिक वर्षात आधीच्या वर्षीच्या पेक्षा 610 % नफा जास्त कमावला , ( 2683 crs to 19041 crs.) आणी भागधारकांना 790 % लाभांश ही दिला .

HPCL या कंपनीने 2020-21 या आर्थिक वर्षात आधीच्या वर्षीच्या पेक्षा 300 % नफा जास्त कमावला , ( 2637 crs to 10664 crs.) आणी भागधारकांना 227.5 % लाभांश ही दिला . कंपनीने share buy back साठी तब्बल 885 crore रूपये खर्चही केला आहे.

करोनानंतर बाकी बहुतांश क्षेत्रातील कंपन्यांची स्थिती खालावली असताना oil कंपन्या घवघवीत नफा कमावून लाभांश / share buy back वर खर्च करतायत यावरुन या कंपन्यांची पाचों उंगलियां घी में असल्याचे स्पष्ट दिसतंय. या कंपन्यांचे बहुतांश शेअर्स केंद्र सरकार च्या मालकीचे असल्याने लाभांशाचा सर्वाधिक लाभ त्यांनाच मिळत असल्याने तेही खूश आहेत. अर्थात हे सर्व ज्या सामान्य माणसाच्या जिवावर चाललंय तो मात्र निमूटपणे वाढत्या किमतीचे चटके सोसतो आहे. एका बाजूला केंद्र व राज्य सरकार भरमसाठ कर लावतंय तर दुसरीकडे oil कंपन्या भरमसाठ नफा कमावतायत आणी करोना संकटामुळे मेटाकुटीला आलेली जनता मात्र रोज होणारी दरवाढ असहाय्य पणे सोसतीये . 

——- विवेक वेलणकर , अध्यक्ष सजग नागरिक मंच पुणे