Notifications

ऐश्वर्या रॉय-बच्चनचे मीम पोस्ट करून माझं काय चुकलं?; विवेक ओबेरॉयचा उद्दामपणा

By PCB Author

May 21, 2019

मुंबई, दि. २१ (पीसीबी) – एक्झिट पोलच्या पार्श्वभूमीवर ऐश्वर्या राय-बच्चनवरील आक्षेपार्ह मीम ट्विटरवर पोस्ट केल्याने अभिनेता विवेक ओबेरॉयला राष्ट्रीय महिला आयोगाने नोटीस बजावली असताना विवेकने मात्र मी काहीच चुकीचं केलंलं नाही, असं म्हटलं आहे. मी माफी मागावी, अशी काहींची मागणी आहे. माझी त्यावर काहीच हरकत नाही. मी माफी मागायलाही तयार आहे पण त्याआधी माझी चूक काय झाली, हे मला सांगायला हवे, असे विवेक ओबेरॉय म्हणाला. कुणीतरी हा मीम बनवला आणि तो पाहून मला हसू फुटलं. मी त्याच्या कल्पकतेला दाद दिली. ही गोष्ट इतकी गांभीर्याने घेण्याची गरजच काय? कुणीही विनाकारण त्यावर गहजब करू नये. मीममध्ये जे दिसत आहेत त्यांनी काहीच हरकत घेतलेली नसताना भलतेच त्यावर आक्षेप का घेत आहेत?, असा प्रश्न विवेकने विचारला.