ऐश्वर्या रायविषयी वादग्रस्त मीम; विवेक ओबेरॉयचा माफीनामा

0
561

मुंबई, दि. २१ (पीसीबी) – एक्झिट पोलवरुन अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनविषयी वादग्रस्त मीम शेअर केल्याने अभिनेता विवेक ओबेरॉय यांच्यावर टीकेची झोड उठविण्यात येत आहे. यानंतर विवेकने  आज (सोमवार) ट्विटरवर शेअर केलेले मीमही  डिलीट  करून माफी मागितली आहे.    

विवेकने  दोन ट्वीट करून माफी मागितली आहे, पहिल्या ट्वीटमध्ये त्याने  म्हटले आहे की, कधी कधी काही जणांना पहिल्या नजरेत मजेशीर आणि निरुपद्रवी वाटते, पण इतरांना ते वाटेलच असे नाही. मी मागील दहा वर्ष, २ हजार पेक्षा जास्त वंचित मुलींच्या सशक्तीकरणासाठी खर्ची केली आहेत. कोणत्याही महिलेचा अपमान होईल, याचा मी विचारही करु शकत नाही.

दुसऱ्या ट्वीटमध्ये विवेक याने म्हटले आहे की, जर मीममुळे एका महिलेच्याही भावना दुखावल्या असतील तर त्यात सुधारणा होणे गरजेचे आहे. मी माफी मागतो.  दरम्यान, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या रॉय आणि तिची मुलगी आराध्या यांचे फोटो असलेले मीम शेअर केल्याने विवेक ओबेरॉयवर सर्व स्तरावरुन जोरदार टीका झाली. तसेच राष्ट्रीय महिला आयोगाने त्याला नोटीस पाठवली होती.