ऐतिहासिक वारसा लाभलेल्या भारतातील या आहेत ऐतिहासिक वास्तू …

0
6375

भारत हा ऐतिहासिक कला, संस्कृती वारसा लाभलेला भव्य असा देश आहे. आपल्या भारतामध्ये अशा काही ऐतिहासिक वास्तू आहेत ज्या डोळ्यांचे अक्षरशः पारणे फेडतात. ऐतिहासिक असल्या कारणाने या वास्तूंना अनन्यसाधारण असे महत्व आहे. आणि बाहेरदेशातून सुद्धा पर्यटक भारतीय वास्तूंना भेट देण्यासाठी येत असतात. तर पाहूया भारतातील परतानाचे विशेष आकर्षण असलेल्या ऐतिहासिक वास्तू ज्या भारताच वेगळेपण दाखवतात…

१. शनिवारवाडा, पुणेमहाराष्ट्र राज्यातील पुणे शहरात स्थित शनिवार वाडा हि पुणे शहरातील भव्य, दिव्य अशी ऐतिहासिक वास्तू आहे. इ.स.च्या १८व्या शतकात हा वाडा मराठा साम्राज्याचे पंतप्रधान, अर्थात पेशवे यांचे निवासस्थान व कार्यालय होते. भारत सरकारने शनिवारवाड्याला महाराष्ट्रातील ‘राष्ट्रीय संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित केले आहे. शनिवारवाडा हि वस्तू बांधून तिची वास्तुशांत ज्या दिवशी केली तो दिवस शनिवार होता म्हणून याला ‘शनिवारवाडा’ असे नाव पडले. मात्र १८२८ मध्ये वाड्यास मोठी आग लागली व आगीत बहुतेक सर्व इमारती जळाल्या.१९१९ मध्ये वाडा संरक्षित स्मारक म्हणून जाहीर झाला. राजकारणाचे येथे फड रंगत. पेशव्यांचा दरबार येथेच होता.

शनिवारवाड्याची इमारत २१ फूट उंच होती. येथून जवळच मुठा नदी वाहते.या वाड्याला पाच दरवाजे असून त्यांना दिल्ली, अलीबहाद्दर किंवा मस्तानी, खिडकी, गणेश, नाटकशाळा ऊर्फ जांभूळ दरवाजा ही नावे आहेत. सर्व दरवाजे टोकदार कमानींमधे असून मोठे अणुकुचीदार लोखंडी खिळे व जाडजूड पट्ट्या ठोकून ते भक्कम केलेले आहेत. या वाड्याचे मुख्य आकर्षण ‘दिल्ली दरवाजा’ या वाड्यातील सर्वांत मोठा दरवाजा आहे. आगीच्या प्रलयातून वाचलेला अस्सल पेशवेकालीन शाबूत असलेला भाग हा एवढाच. पुणे स्थित हि वास्तू अक्षरशः डोळ्यांचे पारणे फेडते. या वास्तूला जगभरातून पर्यटक भेट देण्यासाठी येतात.

३. फत्तेपुर सिकरी, आग्रा

भारतातील आग्रा जिल्ह्यातील हे शहर आजसुद्धा आपला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा टिकवून आहे. मोघल बादशाह अकबर यांनी हे शहर वसवले होते. या शहराने मोघल संस्कृती आणि कला आजही जपून ठेवल्या आहेत. फत्तेपूर सिकरी एका दशकापेक्षा देखील जास्त काळ मोघलांची राजधानी होती.
इथली सर्वांत उंच इमारत बुलंद दरवाजा आहे जिची उंची २८० फूट असून बादशाह अकबर यांनी १६०२ मध्ये गुजरात विजयाची आठवण म्हणून याची निर्मिती केली होती. या शिवाय जामा मशीद, शेख सलीम चिश्ती याची समाधी, दिवान-ए-आम, दिवान-ए-खास, पंचमहल, बिरबलाचा महाल या देखील इथल्या प्रमुख इमारती आहेत. फत्तेपूर सिकरी जाण्यासाठी आग्रा हा सर्वांत जवळचा विमानतळ आहे.

३. लाल किल्ला, दिल्लीदिल्ली स्थित लाला किल्ला हि जगप्रसिद्ध अशा ऐतिहासिक वास्तूंपैकी एक वास्तू आहे. शहाजहानच्या शासन काळात लाल किल्ल्याचा पाया रचला गेला. हा किल्ला पूर्ण तयार होण्यास तब्बल ९ वर्ष गेली. इस्लामी इमारतींप्रमाणेच हा किल्ला देखील अष्टभूजाकार आहे. हा किल्ला सालीमगड किल्ल्याशी उत्तरेला जोडलेला आहे. लहौरी गेट शिवाय सुद्धा इथे प्रवेश करण्यासाठी दुसरे द्वार हाथीपोल आहे. याबाबत अशी मान्यता आहे की इथे राजा आणि त्याचे पाहुणे हत्तीवरून उतरत असत. लाल किल्ल्याची बाकीची प्रमुख आकर्षण केंद्रबिंदू म्हणजे मुमताज महाल, रंग महाल, खास महाल, दीवान-ए-आम, दीवान-ए-खास, हमाम आणि शाह बुर्ज हे आहेत. भारताची शान म्हणून या किल्याकडे पहिले जाते. दरवर्षी या किल्ल्यावर स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी भारताचे पंतप्रधान राष्ट्रीय ध्वज फडकावतात. हा मकबरा आज दिल्लीतील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक मानला जातो. १५६२ – १५७२ च्या दरम्यान याची बांधणी केली गेली. यमुना नदीच्या किनारी संत निजामुद्दीन अवलिया यांच्या दर्ग्याच्या जवळ स्थित या लालकिल्ल्याला युनेस्कोने विश्ववारशाचा दर्जा दिला आहे.

४. म्हैसूर पैलेसमहाराजा पैलेस, राजमहाल म्हैसूरचे कृष्णराजा वाडियार चतुर्थ यांचा आहे जो एक ऐतिहासिक वस्तू म्हणून प्रसिद्ध आहे. याआधी राजमहाल चंदनाच्या लाकडापासून बनलेला होता मात्र दुर्दैवाने एका दुर्घटनेत त्या महालाचे प्रचंड नुकसान झाले ज्यानंतर हा दुसरा महाल बनवण्यात आला. म्हैसूर पैलेस हा उत्कृष्ट कलेचा विलोभनीय असा नमुना आहे. द्रविड, पौर्वात्य आणि रोमन स्थापत्य कलेचा अद्भुत संगम आहे. अतिशय काळजी घेऊन आणि नाजूकता सांभाळत घासलेल्या ग्रेनाईटच्या दगडांनी बनलेल्या या सुंदर महालावर गुलाबी दगडांच्या घुमटांनी साज चढवलेला आहे. या महालामध्ये एक मोठा दुर्ग आहे ज्याचे घुमट सोन्याच्या दगडांनी पूर्णपणे सजवलेले आहे. जेव्हा सूयप्रकाश या घुमटावर पडतो तेव्हा ते अतिशय सोनेरी किरणांनी चमकून उठतात. जसे बाकी महालांमध्ये राजांसाठी दीवान-ए-खास आणि आम लोकांसाठी दीवान-ए-आम असतात तसेच या महालात सुद्धा आहे. हा महाल मोठ्या अनेक कक्षांनी भरलेला असून यामध्ये चित्र आणि राजेशाही हत्यारे जाणीवपूर्वक ठेवण्यात आणि असून ती आजही जपून ठेवण्याचा आणि पुढील पिढ्यांना इतिहास सांगण्याचा हा प्रयत्न आहे. राजेशाही पोशाख, आभूषणे, महोगनी वृक्षाच्या लाकडाचे बारीक नक्षीकाम केलेले भलेमोठे दरवाजे आणि छतांना लागलेले झाड-फानूस महालाची शोभा वाढवतात. पर्यटकांसाठी हा महाल सकाळी १० ते संध्याकाळी ४.३० पर्यंत खुला असतो. संध्याकाळच्या वेळी जेव्हा महालात रोषणाई केली जाते तेव्हा या म्हैसूर पैलेस च्या सौंदर्यामध्ये आणखीनच भर पडते. हा पैलेस म्हणजे ऐतिहासिक वस्तूंचे संग्रहालय आहे.

५. जलमहाल, जयपुरजयपूर स्थित जलमहाल हा ऐतिहासिक वास्तूचे असे उदाहरण आहे जो डोळ्यांचे पारणे फेडतो. जयपूरचे राजेमहाराजे इथे निवांत वेळ घालवण्यासाठी येत असत. सध्या जयपूर मधील पर्यटनाचे आकर्षणाचे हे केंद्र आहे. मानसागर तलावाच्या मध्ये असलेल्या या महालाचे सौंदर्य शब्दात व्यक्त करण्यासारखे नाही इतके अप्रतिम आहे. जयपूर मधील जलमहाल पाण्यावर तरंगणारे एक शानदार ऐतिहासिक स्थळ आहे जे जयपूर शहरापासून फक्त ८ किमी अंतरावर असलेल्या आमेर मार्गावर स्थित आहे. आमेर मध्ये असलेल्या पाणीटंचाईमुळे याची निर्मिती करण्यात आली होती. महालाच्या आत प्रवेश करण्यासाठी नौका उपलब्ध असतात.

६. चारमिनार, हैदराबादहैदराबाद शहर स्वतःमध्येच एक सुंदर अशी कलाकृती आहे. या शहराची ओळख असलेला ‘चारमिनार’ हि तेथील विशेष लक्षवेधी वस्तू आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे ‘चारमिनार’ हा इस्लामिक वास्तुकलेच उत्कृष्ट उदाहरण आहे. जेव्हा १५९१ महम्मद कुली कुतुबशाह द्वारे शहरातील प्लेगची साथ संपल्याच्या आनंदात एक वास्तू बनवण्यात आली. तीच हि ‘चारमिनार’. चार मिनारांनी मिळून बनलेली एक चौरसाकार प्रभावशाली आकर्षक इमारत म्हणजे ‘चारमिनार’. हि वस्तू पुढे हैद्रराबाद शहराची ओळख बनली. ‘चारमिनार’च्या आर्क मध्ये रोज रोषणाई केली जाते जी डोळ्यांचे पारणे फेडते. विमान, रेल्वे, बस किंवा आपल्या खाजगी गाड्यांनी सुद्धा हैदराबादला जाता येते. तेथील रेल्वे स्थानकापासून हि वस्तू साधारण ७-८ किमी अंतरावर आहे.आहे.

७. सांची स्तूप, मध्यप्रदेश‘सांची स्तूप’ हा भारतातील विशेष लक्षवेधी स्थळांपैकी एक आहे. भारतातील मध्यप्रदेशाची राजधानी भोपाळ आणि विदिशा यांच्या मध्ये विराजमान भव्य ‘सांची स्तूप’ केवळ भारतातीलच नाही तर विदेशातील पर्यटकांचेसुद्धा लक्ष वेधून घेतो. सम्राट अशोक यांनी इसवीसन पूर्व तिसऱ्या शतकात हा ‘सांची स्तूप’ बनवला होता. बौद्ध धर्माची शिकवण जनामानसापर्यंत पोहचवण्यासाठी सम्राट अशोक यांनी हा स्तूप तयार केला असून सांचीस्तूप हा शांती, आस्था, साहस आणि प्रेम यांचे प्रतीक आहे. खूप काळापासून दुर्लक्षित राहिलेला सांची स्तूप आज केवळ भारतातच नाही तर जगभरात नावारूपाला आला आहे. फक्त एवढच नाही तर आपल्या ऐतिहासिक महत्त्वामुळे युनेस्कोच्या जगाच्या वारशांच्या यादीत देखील ‘सांची स्तूप’ला विशेष स्थान आहे.

८. हवा महल, जयपुरभारतातील गुलाबी शहर म्हणजेच Pink City म्हणून ओळखलं जाणारं जयपूर हे तिथल्या एका ऐतिहासिक वस्तू साठी सुद्धा प्रचलित आहे. जयपूर येथे असलेली अलिशान इमारत म्हणजेच “हवामहल” हि राजस्थानचे प्रतीक म्हणून ओळखली जाते. आणि शिवाय ती जगप्रसिद्ध आहे. या इमारतीची खासियत आहे कि, या इमारतीत केवळ १ नव्हे २ नव्हे तर तब्बल ३६५ खिडक्या आणि झरोके आहेत. ‘हवामहल’ची निर्मिती जयपूरचे महाराज सवाई प्रताप सिंह यांनी १७९९ मध्ये केली. या आलिशान, बहारदार ‘हवामहल’चे चांदपोल आणि आनंदपोल नावाचे दोन दरवाजे असून आनंदपोलवर असलेल्या गणपतीच्या सुंदरशा आकर्षक प्रतिमेमुळे याला ‘गणेश पोल’ देखील म्हंटल जात. गुलाबी शहराचा हा गुलाबी गौरव आपल्या अद्भुत आणि चमकारीक बनावटीमुळे आजही विश्वविख्यात आहे. ही इमारत जयपूरच्या “बडी चौपड” चौकापासून “चांदी की टकसाल” कडे जाणाऱ्या मार्गावर आहे. गुलाबी शहरातील हि इमारत राजस्थानी आणि फारसी स्थापत्यकलेचे संमिश्र रूप आहे.