Bhosari

ऐकावे ते नवलच: दिघीत लग्नाचे आमिष दाखवून तरुणीने अल्पवयीन मुलाला पळवले

By PCB Author

March 19, 2019

दिघी, दि. १९ (पीसीबी) – लग्नाचे आमिष दाखवून एका १९ वर्षीय तरुणीने अल्पवयीन मुलाला पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. ही घटना दिघी येथे घडली.

याप्रकरणी अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पायल राजकुमार भस्मे (वय १९, रा. नंदनवन हौ. सोसायटी, घरकुल, चिखली) या तरुणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पायल आणि अल्पवयीन मुलगा एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत होते. बुधवार (दि.१३) मार्च रोजी सकाळी नऊच्या सुमारास पायलने फिर्यादी यांच्या १७ वर्षीय मुलास लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. याप्रकरणी मुलाच्या वडिलांनी दिघी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिस तपासात ते दोघे मुंबईत असल्याचे समोर आले आहे. त्या ठिकाणी पोलिसांची एक टीम पाठवण्यात आली आहे. दरम्यान लग्न करुन आम्ही मोठे होऊनच परत येणार असे त्यांनी मित्रांना सांगितले समजते. दिघी पोलीस अधिक तपास करत आहेत.