एस.एम.जोशी महाविद्यालयात रयत आविष्कार २०२० उघाटन समारंभ संपन्न

0
446

पुणे,दि.९(पीसीबी) – संशोधन हे फक्त विज्ञान शाखेची मक्तेदारी नाही. संशोधनाला कोणत्याही भिंती आडव्या येत नाहीत. शोधाला शोधायला संशोधकाची दृष्टी लागते. आपली आई सुद्धा उत्तम संशोधक आहे पण आपण ते मानले पाहिजे . आपल्या संशोधनाचा समाजाला उपयोग झाला पाहिजे असे विचार प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी मांडले . एस.एम.जोशी कॉलेजात रयत आविष्कार २०२० उदघाटन समारंभ काल संपन्न झाला,यावेळी डॉ. चाकणे उद्घाटक म्हणून बोलत होते.

वरिष्ठ शास्त्रज्ञ व विभाग प्रमुख अग्रोनोमी वसंतदादा शुगर इन्स्टीटयूट पुणे चे मा. डॉ. प्रदीप घोडके हे अध्यक्ष स्थानी होते. ते म्हणाले कि संशोधकांना भविष्यात भरपूर संधी आहेत . आपले संशोधन पुस्तकात न राहता ते शेतकऱ्याच्या बांधावर जावून त्यांच्या कल्याणासाठी त्याचा वापर केला जावा. त्यातून राष्ट्रीय हित साधले जाईल.

या प्रसंगी आलेल्या मान्यवरांचे स्वागत मा. प्राचार्य अरविंद बुरुंगले यांनी केले. याप्रसंगी ते म्हणाले की श्रमसंस्कृतीच्या बळावर आपण मोठे होऊ शकतो. स्वत:ची ओळख निर्माण करा , चिंतन , मनन करा त्यातून नाविन्याचा ध्यास घ्या असे प्रतिपादन त्यांनी उपस्थित संशोधकांना केले. रयत शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालयातील २१० संशोधकांनी सहभाग घेतला.

दरम्यान, प्रास्ताविक डॉ. एम एल डोंगरे यांनी केले तर उपस्तीथांचे आभार डॉ शरद पासले यांनी मानले.