एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, जय गणेश साम्राज्य चौकातील घटना

0
258

मोशी, दि. 8 (पीसीबी) : एसटी बसने पाठिमागून दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. जय गणेश साम्राज्य चौक, मोशी याठिकाणी गुरूवारी (दि.7) सकाळी नऊ वाजता हि घटना घडली. किरण हनुमंत अमराळे (वय 24, रा. साई कॉलनी, एकतानगर, चाकण) असे या अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

याप्रकरणी चंद्रकांत नानाभाऊ अमराळे (वय 43, रा जाधववाडी, चिखली, मुळगाव दावडी, खेड) यांनी भोसरी एमआयडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एसटी चालक रमेश गोपीनाथ डमाळे (वय 47, रा. साई खिंड, चिकणी, अहमदनगर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत किरण गुरूवारी सकाळी नऊच्या सुमारास आपल्या (एमएच 14 जीझेड 3503) या मोटर सायकल वरून पुणे नाशिक हायवेवरून बाणेर कडे जात होता. त्यावेळी (एमएच 06 एस 8468) या एसटी त्याच्या मोटारसायकला पाठिमागून धडक दिली. या धडकेत गंभीर जखमी झालेल्या किरण अमराळे याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी अधिक तपास भोसारी एमआयडीसीचे पोलीस उपनिरिक्षक आरबी जाधव करत आहेत.