एसटीच्या तिकीट दरात वाढ होण्याची शक्यता

0
434

मुंबई, दि. ३ (पीसीबी) –  राज्य परिवहनचा (एसटी) प्रवास आता महागण्याची शक्यता आहे. इंधनदरवाढ आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा फटका एसटी महामंडळाला बसला आहे. या पार्श्वभूमीवर दरात वाढ करण्याचा प्रस्ताव एसटीने वाहतूक विभागाकडे पाठवले आहे.

एसटी महामंडळाला दरवर्षाला तीन हजार कोटींचे डिझेल लागते. त्यामुळे एकूण वाढलेल्या खर्चामुळे एसटी महामंडळाचे बजेट कोलमडत आहे. एसटीच्या तिकीट दरात वाढ करण्याचा प्रस्ताव वाहतूक विभागाकडून ठेवण्यात आला असून एसटीच्या संचालक मंडळाने त्याला मान्यताही दिली आहे.

आता हा प्रस्ताव आता राज्य परिवहन प्राधिकरणाकडे पाठवण्यात आला आहे. इंधन, वेतन, टायर किंवा एसटीचे साहित्य या गोष्टींमध्ये दरवाढ झाल्यास एसटीच्या तिकीटदरवाढीचा प्रस्ताव ठेवला जातो. त्यामुळे या दरवाढीचा भार एसटीच्या सर्वसामान्य प्रवाशांना सहन करावा लागणार आहे.