एसआरपी च्या १४ जवानांना कोरोना

0
429

पुणे, दि. २७ (पीसीबी) : पुण्यात काल (26 मे) राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) एकाच कंपनीनीतल 14 जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. 33 जवानांचे अहवाल अजून प्रतीक्षेत आहेत. याआधी सहा जवानांना कोरोनाची लागण झाली होती. या सर्व जवानांना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. संसर्ग झालेल्या जवानांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. दरम्यान, राज्यात आतापर्यंत 1800 पेक्षा अधिक पोलिसांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

रामटेकडी येथील एसआरपीएफ क्रमांक दोनची एक कंपनी बंदोबस्तासाठी बाहेरगावी गेली होती. बंदोबस्त पूर्ण केल्यानंतर संबंधित कंपनी 19 मे रोजी पुण्यात आली. त्यानंतर 21 मे रोजी काही जवानांना कोरोनाची लक्षणं दिसू लागली. त्यामुळे या कंपनीतील 20 जवानांच्या घशातील नमुने घेण्यात आले.

नमुने घेतल्यानंतर सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यानंतर काल आणखी 14 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. सध्या या सर्व जवानांवर एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

नुकतेच मालेगावहून औरंगाबाद परतेलेल्या 67 जवानांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर या सर्व जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर हे सर्व जवान कोरोना मुक्त झाले आहेत.

राज्यात आतापर्यंत अनेक ठिकाणी जवानांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे. तर पोलीस कर्मचाऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाली आहे.