एल्गार परिषद प्रकरण : पाचही विचारवंतांच्या स्थानबध्दतेत १७ सप्टेंबरपर्यंत वाढ

0
536

दिल्ली, दि. १२ (पीसीबी) – नक्षलवादी संघटनांशी संबंध असल्यावरून पुणे पोलिसांनी कारवाई केलेले कवी वरवरा राव, अॅड. सुधा भारद्वाज, अॅड. अरुण परेरा, वर्नन गोन्साल्विस आणि गौतम नवलखा या पाच विचारवंतांना १७ सप्टेंबरपर्यंत स्थानबद्धतेत ठेवण्यात यावे, असा आदेश आज (बुधवार) सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

पुण्यात आयोजित एल्गार परिषदेच्या अनुषंगाने पोलीस ठाण्यामध्ये बेकायदेशीर प्रतिबंधक हालचाली कायदा आणि विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी पुणे पोलिसांनी कवी वरवरा राव, अॅड. सुधा भारद्वाज, अॅड. अरुण परेरा, वर्नन गोन्साल्विस आणि गौतम नवलाखा या पाच जणांना अटक केली होती. या पाचही आरोपींचा नक्षलवादी संघटनेशी संबंध असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.  मात्र, या कारवाईविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली. या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली असून पाचही विचारवंतांच्या स्थानबद्धतेत  १७ सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी देखील त्यांना स्थानबद्धतेत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले होते.