Maharashtra

एलइडी बोटींवर कडक कारवाई करण्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आदेश

By PCB Author

January 23, 2020

मुंबई, दि.२३ (पीसीबी) – पारंपरिक मत्स्यव्यवसायिकांच्या मागणीची दखल घेऊन एलइडी बोटींवर कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. पर्ससीन व एलईडी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीला खासदार सुनील तटकरे , माजी आमदार कदम , मत्स्य आयुक्त राजीव जाधव , डीसीपी (पोर्ट) डॉ रश्मी करंदीकर तसेच मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी , मच्छीमार बांधव उपस्थित होते.