एलइडी बोटींवर कडक कारवाई करण्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आदेश

0
316

मुंबई, दि.२३ (पीसीबी) – पारंपरिक मत्स्यव्यवसायिकांच्या मागणीची दखल घेऊन एलइडी बोटींवर कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. पर्ससीन व एलईडी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीला खासदार सुनील तटकरे, माजी आमदार कदम, मत्स्य आयुक्त राजीव जाधव, डीसीपी (पोर्ट) डॉ रश्मी करंदीकर तसेच मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी, मच्छीमार बांधव उपस्थित होते.