एम .यु . महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा; विद्यार्थी, कर्मचारी आणि माजी विद्यार्थ्यांनी यांचा सहभाग

0
325

पिंपरी,दि.२२(पीसीबी) – मंघनमल उधाराम वाणिज्य महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. योग आणि प्राणायाम या विषयी 2 सत्रे आयोजित करण्यात आली होती.या कार्यक्रमात विद्यार्थी, कर्मचारी आणि माजी विद्यार्थी असे एकूण ८२ व्यक्तींचा सहभाग होता.

योग तज्ज्ञ आणि माजी विद्यार्थिनी सौ. शोभा सुनील मिरचंदानी यांनी सहभागी व्यक्तींना मार्गदर्शन केले . सांस्कृतिक समन्वयक डॉ. पुष्पा पमनानी, रा.से. यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. लीना मोदी आणि सह. प्रा.हेमंत राजेस्थ यांनी या समन्वयना केले . प्रभारी प्राचार्य डॉ. विनिता बसंतानी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.