Desh

एम. जे.अकबर यांचा प्रिया रमानी यांच्याविरोधात मानहानीचा दावा

By PCB Author

October 15, 2018

नवी दिल्ली, दि. १५ (पीसीबी) –  लैंगिक शोषणाचे आरोप केल्याप्रकरणी परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी पत्रकार  प्रिया रमानी यांच्याविरोधात आज (सोमवार) मानहानीचा दावा दाखल केला आहे. अकबर यांनी दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयात हा खटला दाखल केला आहे. 

रविवारी (दि.१४) परदेशातून आल्यानंतर अकबर यांनी पत्रकार परिषदेत प्रिया रमानी यांच्यासह इतर महिलांनी केलेले आरोप फेटाळून लावले होते. हे आरोप करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. त्यानुसार त्यांनी पटियाला हाऊस न्यायालयात रमानी यांच्याविरोधात खटला दाखल केला आहे.

अकबर यांनी रमानी यांच्याविरोधात आयपीसी कलम ४९९ आणि ५०० अंतर्गत खटला दाखल केला आहे. या कलमानुसार दोषी आढळल्यास दोन वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. करंजावाला अँड कंपनी या लॉ फर्मच्या मार्फत हा खटला दाखल केला आहे.