एमआयएम, वंचित बहुजन आघाडी तुटणार ?

0
392

मुंबई, दि. ४ (पीसीबी) – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर  एमआयएम वंचित बहुजन आघाडीपासून फारकत घेण्याच्या तयारीत आहे. एमआयएमने दिलेले जागावाटपाचे सूत्र वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांना  मान्य नाही.  तर त्यांनी  दिलेली ऑफर एमआयएमला मान्य नाही.  यामुळे  दलित मुस्लीम मतांची ही आघाडी तुटण्याची  चिन्हे दिसू लागली आहेत. 

लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून एमआयएमचा खासदार निवडून आला आहे. ही कामगिरी पाहता  एमआयएमने वंचित बहुजन आघाडीकडे  सुरुवातीला १०० जागांची मागणी केली होती.  त्यानंतर  ७५ वरून ५० जागा घेण्याची एमआयएमने  तयार दाखवली.  मात्र, आंबेडकरांनी या  मागण्या धुडकावून लावल्या.

आंबेडकरांनी एमआयएमला फक्त ८ जागा देण्याची तयारी दर्शवली होती. यामुळेच एमआयएमने वंचितबरोबर फारकत घेण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान,  ओवेसी आणि प्रकाश आंबेडकर यांची पुण्यात बैठक झाली होती. या बैठकीत आंबेडकरांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली होती, अशी माहिती मिळत आहे.