एमआयएम म्हणजे भाजपची टीम बी; बाळासाहेब थोरातांचा गंभीर आरोप

0
256

मुंबई,दि.२२(पीसीबी) – एमआयएम ही भाजपची बी टीम असल्याचा आरोप महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत थोरात बोलताना त्यांनी एमआयएमसोबतच भाजवरही टीका केली आहे.

एमआयएमचे आमदार वरिस पठाण यांच्या वक्तव्याचे राज्यभरात पडसाद उमटत आहेत. बाळासाहेब थोरात यांनी पठाण यांच्या वक्तव्यावरुन एमआयएम पक्षालाच धारेवर धरलं आहे.

सीएए आणि एनआरसीवरुन भाजपला समाजात विभाजन होताना दिसत नाही म्हणून भाजप आणि एमआयएम मिळून खेळी करत आहेत, असाही आरोप थोरातांनी केला आहे. भाजपचे नेते वारंवार सरकारविरोधात बोलत आहेत. ही भाजपची पराभूत मानसिकता आहे. पक्षातील आमदार टिकावेत म्हणून ते सरकारविरोधात वक्तव्ये करत आहेत, असंही थोरात यावेळी म्हणाले.

दरम्यान, निवडणुकीच्या आधी पुन्हा येणार पुन्हा येणार असा नारा देत होते पण ते काही आलेच नाहीत, असा टोलाही बाळासाहेब थोरातांनी यावेळी भाजपला लगावला आहे.