Maharashtra

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांचा शिवसेनेत प्रवेश

By PCB Author

September 14, 2019

मुंबई, दि. १४ (पीसीबी) –  एन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असलेले पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी   शर्मा यांना शिवबंधन बांधले.  शिवसेना प्रवेशानंतर ते  नालासोपारा किंवा अंधेरी मतदारसंघातून  विधानसभा लढवणार असल्याचे सांगितले जात आहे.  

शर्मा यांचा  शिवसेनेत प्रवेश  झाल्यानंतर विरारमध्ये शिवसैनिकांनी घोषणा देत जल्लोष केला आहे. विरार पूर्व मनवेल पाडा तलावा शेजारील मातोश्री संपर्क कार्यालयाजवळ शिवसैनिकांनी जल्लोष केला. सायंकाळी सहा वाजता मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शर्मा अधिकृत शिवबंधन बांधून शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला.

दरम्यान, वसई विरार भागात बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांचे  वर्चस्व आहे.  नालासोपारामधून क्षितीज ठाकूर रिंगणात उतरले,  तर त्यांना  शह देण्यासाठी प्रदीप शर्मा तुल्यबळ उमेदवार ठरू शकतात. कारण या मतदारसंघात उत्तर भारतीयांची मते निर्णायक  ठरणार आहेत. मूळचे उत्तर भारतीय असणारे प्रदीप शर्मा उत्तर भारतीयांना  शिवसेनेकडे आकृष्ट करू शकतात.