Maharashtra

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांचा राजीनामा मंजूर; शिवसेनेकडून निवडणुक लढण्याची शक्यता

By PCB Author

September 10, 2019

मुंबई, दि. १० (पीसीबी) – एन्काऊंटर स्पेशालिस्ट पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. यामुळे ते आगामी विधानसभा निवडणुक शिवसेने तर्फे लढणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

शर्मा यांनी ४ जुलै रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. ते नालासोपारा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. शर्मा शिवसेनेकडून विधानसभा निवडणूक लढल्यास बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितीज ठाकूर यांना ते आव्हान देऊ शकतात.

प्रदीप शर्मा यांनी ३१२ एन्काऊंटरमध्ये भाग घेत, १०० हून अधिक गुंडांचे एन्काऊंटर केले आहेत. रामनारायण गुप्ता उर्फ लखनभय्या याचे बनावट एन्काऊंटर आणि कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंध या आरोपातून शर्मा यांना २००८ मध्ये पोलीस दलातून निलंबित करण्यात आले होते. लखनभय्या एन्काऊंटर प्रकरणी शर्मा यांच्यासह १३ जणांना अटकही करण्यात आली. मात्र २०१३ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची या आरोपातून मुक्तता केली. तेलगी बनावट मुद्रांक प्रकरणातील आरोपांतूनही त्यांची मुक्तता झाली होती.