Desh

एनडीएला बळ; शिवसेनेपाठोपाठ भाजपची आणखी एका पक्षाशी युती

By PCB Author

February 19, 2019

चेन्नई, दि. १९ (पीसीबी) –  शिवसेनेपाठोपाठ आणखी एका मित्रपक्षाशी युती करण्यात भाजपला यश  आले आहे. अण्णाद्रमुक आणि भाजपने  आज (मंगळवारी) तामिळनाडू व पुद्दुचेरीमध्ये लोकसभा निवडणूक एकत्र लढवणार असल्याचे जाहीर केले. तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी आणि अण्णाद्रमुकचे नेते ओ. पनीरसेल्वम यांच्या उपस्थितीत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी ही घोषणा केली.

तामिळनाडूत लोकसभेच्या एकूण ३९ जागा  आहेत. त्यापैकी ५ जागा भाजप लढवणार आहे. तर पुद्दुचेरीत भाजप लोकसभेची एक जागा लढवणार असल्याचे घोषित करण्यात आले.

तामिळनाडूतील २१ मतदारसंघांमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीत भाजप अण्णाद्रमुकच्या उमेदवारांना पाठिंबा देणार आहे. लोकसभा निवडणूक मोदींच्या नेतृत्त्वाखाली आणि विधानसभा निवडणूक ओ. पनीरसेल्वम व ई. पलानीस्वामी यांच्या नेतृत्त्वाखाली लढवण्यात येईल, असे  गोयल यांनी सांगितले.