Pimpri

एनकाउंटर स्पेशलिस्ट रामचंद्र जाधव यांची पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात सहायक आयुक्त म्हणून नियुक्ती

By PCB Author

October 30, 2018

पिंपरी, दि. ३० (पीसीबी) – एनकाउंटर स्पेशलिस्ट रामचंद्र जाधव यांच्यासह नागपूरमध्ये विशेष पोलीस उपअधिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या नीलीमा जाधव यांची पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात सहायक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे आता पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडील सहायक पोलीस आयुक्तांची संख्या पाचवर पोहचली आहे.

या दोन्ही अधिकाऱ्यांमुळे पोलीस प्रशासनाचा काहीसा भार कमी होणार आहे. तसेच एनकाउंटर स्पेशलिस्ट रामचंद्र जाधव यांनी यापूर्वी देखील पुणे ग्रामीण पोलीस दलात काम केले आहे. त्यांनी देहुरोड येथील कुख्यात गुंड महाकाली आणि तळेगाव येथील सतीश शेट्टी खुन प्रकरणातील अट्टल गुन्हेगार शाम दाभाडे आणि त्याचा साथीदार धनंजय शिंदे यांचा एनकाउंटर केला होता. रामचंद्र यांची पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये सहायक आयुक्त म्हणून बदली झाल्याने गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.