एटीएम मध्ये झाला अचानक स्फोट; चाकण परिसरात खळबळ

0
299

चाकण,दि.२१(पीसीबी) – चाकण एमआयडीसी परिसरात एका ATM सेंटरमध्ये अचानक स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. एटीएम सेंटरमध्ये झालेल्या या स्फोटामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. चाकण MIDC परिसरातील आंबेठान गावाजवळील भांबोली फाट्यावर असलेल्या हिताची बँकेच्या ATM सेंटरमध्ये हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र, हा स्फोट नेमका कसला आहे आणि कशामुळे झाला आहे याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळू शकलेली नाहीये.

स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार आज पहाटे तीन वाजताच्या सुमारास हा स्फोट झाला आहे. हा स्फोट इतका भीषण होता की, ATM सेंटरचे दरवाजे दूर फेकले गेले आणि ATM मशीन ही जळाली आहे. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाहीये. मात्र या विचित्र घटनेनं सध्या नागरिकांमध्ये भीतीचं वातवरण पसरलं आहे.

दरम्यान हा स्फोट चोरीच्या उद्देशाने केला गेला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. चाकण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी आणि स्फोटाच नेमकं कारण शोधण्यासाठी श्वान पथक तसेच बॉम्ब शोधक आणि नाशक पथकही घटनास्थळी दाखल झालं आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.