Pimpri

एजंटने कार शोरूमला घातला दहा लाखांचा गंडा

By PCB Author

September 29, 2020

हिंजवडी, दि. २९ (पीसीबी) – कार शोरूम मध्ये कमिशन बेसिसवर काम करणा-या एका एजंटने शोरूमला 10 लाखांचा गंडा घातला आहे. कार विक्री केल्यानंतर आलेले पैसे शोरूमला न देता त्याचा स्वताकडे ठेऊन अपहार केला आहे. याबाबत एजंटवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल काबरा (रा. उजवी भुसारी कॉलनी, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी शोरूमचे व्यवस्थापक हेमंत नीलकंठ जाधव (वय 43, रा. शनिवार पेठ, पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाळुंगे येथे सुमनकीर्ती कार्स या शोरूममध्ये फिर्यादी जाधव व्यवस्थापक म्हणून काम करतात. तर आरोपी काबरा त्याच शोरूममध्ये कमिशन बेसिसवर काम करत आहे. शोरूममधून नवीन आणि जुन्या कार विकल्या जातात. आरोपी काबरा याने साडेसहा लाखांची मारुती डिझायर कार (एम एच 45 / ए डी 9045) आणि साडेतीन लाखांची वॅगन आर कार (एम एच 12 / पी सी 5211) दोन ग्राहकांना विकल्या. त्यानंतर ग्राहकांकडून आलेले दहा लाख रुपये काबरा याने शोरूमकडे जमा न करता स्वताकडे ठेऊन त्याचा अपहार केला. याबाबत काबरा याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.