एचए कॉलनीमध्ये प्रेमप्रकरणातून महिलेचा डोक्यात दगड घालून खून

0
768

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – प्रेमप्रकरणातून एचए कॉलनीमध्ये एका २३ वर्षीय विवाहित महिलेच्या डोक्यात दगड घालून आज (गुरूवारी) सकाळी खून करण्यात आला.  संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. प्रेमप्रकऱणातून खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त् केला आहे.

किरण काटे (वय २३, महात्मा फुलेनगर, एमआयडीसी, भोसरी) असे खून झालेल्या महिलेचे नांव आहे. तर आकाश लाटे (वय २३, महात्मा फुलेनगर, एमआयडीसी, भोसरी, सध्या रा. नाशिक) असे संशयित आरोपीचे नांव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एचए कॉलनीमधील एफ- २ बंगल्याजवळ आज सकाळी किरण काटे यांच्या डोक्यात आकाशने दगड घालून खून केला. किरण यांचे पती मयत असून त्यांना दोन मुले आहेत. तर किरण आणि आकाश यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते. यातूनच त्यांच्या मध्ये वाद होऊन किरण यांचा खून करण्यात आला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. अधिक तपास पिंपरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हरिदास बोचरे करत आहेत.