एखाद्याला पत्ता सांगणे देखील झाले धोक्याचे…वाचा सविस्तर

0
271

निगडी, दी. 13 (पीसीबी) – पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दोघांनी मिळून एका व्यक्तीला थांबवले. त्यानंतर व्यक्तीकडील रोख रक्कम, मोबाईल फोन आणि सोन्याची चेन असा ऐवज जबरदस्तीने हिसकावून चोरून नेला. ही घटना मंगळवारी (दि. 12) मध्यरात्री सव्वा एक वाजता खंडोबा माळ, निगडी प्राधिकरण येथे घडला.

दादाराव राजाराम धायगुडे (वय 39, रा. हडपसर, पुणे. मूळ रा. शिंगोली, ता. जि. उस्मानाबाद) यांनी याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी मध्यरात्री सव्वाएक वाजता फिर्यादी धायगुडे प्राधिकरण निगडी येथील खंडोबा माळ येथून जात होते. त्यावेळी त्यांच्याजवळ एका दुचाकीवरून दोघेजण आले. त्यांनी हात दाखवून धायगुडे यांना थांबवले. मोरेवस्तीकडे जाणारा रस्ता विचारत दोघांनी धायगुडे यांच्याकडील तीन हजार 400 रुपये रोख रक्कम, 10 हजारांचा मोबाईल फोन आणि १८ हजारांची सोन्याची साखळी, तसेच आधारकार्ड, पॅनकार्ड, एटीएम कार्ड, लायसन्स असा एकूण 31 हजार 400 रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून चोरून नेला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.