एखाद्याचा खून केल्याने कुणी दहशतवादी होत नाही; शरद पोंक्षेंचा कमल हसनवर पलटवार

0
615

मुंबई, दि. १५ (पीसीबी) – दहशतवाद ही संकल्पनाच वेगळी आहे. एखाद्याची विचारसरणी न पटल्याने त्याचा खून करणे ही गोष्ट वेगळी आहे.  एखाद्याचा खून केल्याने कुणी दहशतवादी होत नाही, असे सांगून अभिनेते शरद पोंक्षे यांनी  अभिनेते आणि मक्कल निधी मय्यम पक्षाचे संस्थापक कमल हासन यांचा निषेध केला आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे हा स्वातंत्र्योत्तर भारतातील पहिला हिंदू दहशतवादी होता, असे विधान  कमल हासन यांनी केले होते.  या विधानावर मोठे वादंग उठले असून शरद पोंक्षे यांनी हसन यांच्या विधानाचा निषेध केला आहे.

शरद पोंक्षे यांनी फेसबुकवर पोस्टवर म्हटले आहे की, हिंदू धर्म हा मुळातच सहिष्णूवादी. इतिहास साक्ष आहे की हिंदूंनी कधीही दहशतवादी कारवाया केल्या नाहीत. आक्रमणं केली नाहीत. आम्ही प्रत्येक मुसलमानाकडे दहशतवादी म्हणून बघतच नाही. म्हणूनच जगात मुसलमान सर्वात सुरक्षित व सुखी कुठे राहत असतील तर ते हिन्दुस्थानात आणि हे कित्येक मुसलमानांचं मत आहे.

पण तरीही एक अभिनेता केवळ राजकीय स्वार्थासाठी हिंदू दहशतवादी असा उल्लेख करतोय तेही जाहीरपणे आणि आपण ते खपवून घेतो. हाच हिंदूंचा सहिष्णूपणा,’ असे त्यांनी म्हटले आहे.