Maharashtra

एक शिवप्रेमी म्हणून मी तुमच्या बरोबर आहे – निलेश राणे

By PCB Author

February 05, 2020

मुंबई,दि.५(पीसीबी) – भाजप नेते निलेश राणे यांनी राष्ट्रवादीची सत्ता आहे. मग तर एकच शिवजयंती झालीच पाहिजे! एकदा काय तो दोन शिव जयंतीचा वाद मोडून टाकाच !! एक शिवप्रेमी म्हणून तुमच्या बरोबर आहे! हीच ती वेळ! जय शिवराय! , असं ट्विट करत राष्ट्रवादीच्या शिवजयंतीबाबतच्या भूमिकेला आपला जाहिर पाठिंबा दर्शविला आहे.

राष्ट्रवादी ची सत्ता आहे..
मग तर एकच शिव जयंती झालीच पाहिजे!
एकदा काय तो दोन शिव जयंती चा वाद मोडून टाकाच !!
एक शिव प्रेमी म्हणून तुमच्या बरोबर आहे !
हीच ती वेळ !
जय शिवराय!!!

— nitesh rane (@NiteshNRane) February 4, 2020

अवघ्या महाराष्ट्राचं दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती तारखेनुसार साजरी करावी. यासाठी राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी काल ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्याचा हट्ट सोडावा, असं आवाहन केलं.

दरम्यान, राष्ट्रवादी सत्तेत असल्याने शिवजयंती एकदाच झाली पाहिजे, असं म्हणत निलेश राणेंनी शिवसेनेला चिमटे काढले आहेत.