एक अपमान काँग्रेसला किती भारी पडला बघा!

0
1381

गुहाटी, दि. 9 (पीसीबी) : तेंव्हा आसाम या राज्यात आएक अपमान काँग्रेसला किती भारी पडला बघा!णि केंद्रात काँग्रेसची सत्ता होती. आसामशी संबंधित महत्वाच्या विषयांवर चर्चा करायला एक काँग्रेसी नेते आसाम वरून दिल्लीला गेले होते. त्यांची राहुल गांधी यांच्या बरोबर मिटिंग ठरली होती. राहुल गांधी हे त्या मिटिंगमध्ये आले. पण सोबत आपला कुत्रा घेऊन आले! नाही मी कोणाबद्दल नाही, पिद्दी या त्यांच्या कुत्र्याबद्दलच बोलतोय. मिटिंग सुरू झाली. आसामहून आलेले हे नेते कळकळीने आपल्या राज्याचे मुद्दे मांडू लागले. पण, त्या नेत्यांना व त्यांनी सोबत आणलेल्या शिष्टमंडळाकडे संपूर्ण दुर्लक्ष करून पिद्दी या त्यांच्या लाडक्या कुत्र्यासोबत राहुल गांधी खेळत बसले! त्या कुत्र्याला बिस्कीट खाऊ घालत राहिले. त्या कुत्र्याशी बोलत, त्याचे लाड करत होते. बराच वेळ हे सगळं असंच सुरू होतं. त्यानंतर मात्र हे नेते भडकले. अपमान सहन न झाल्याने हे नेते जागच्या जागी राहुल गांधी यांच्या तोंडावर ‘जर तुम्हाला आपल्या नेत्यांना सन्मान देता नाही, तर असा पक्ष मी आत्ताच्या आत्ता सोडतोय’ हे सांगून सरळ मिटिंगमधून बाहेर पडले.

एक तो दिवस आहे, आणि एक आजचा दिवस! या नेत्यांनी त्यांच्या अपमानाचा बदला असा घेतला की काँग्रेस पक्षाला फक्त आसाममधूनच नाही तर संपूर्ण नॉर्थ-ईस्ट मधून या माणसाने हद्दपार केलं आहे. काँग्रेस सोडल्यानंतर त्यांनी भाजप जॉईन केली आणि आज भाजपला जवळजवळ संपूर्ण नॉर्थ-ईस्ट मध्ये त्यांनी सत्तेत आणलं आहे. एक अपमान काँग्रेसला किती भारी पडला बघा!

अरे काय हवं होतं त्यांना? आई-बाप दोघेही साहित्यिक आहेत त्यांचे! अशा आई सरस्वतीचा आशिर्वाद असलेल्या कुटुंबातून आलेल्या माणसाला फक्त योग्य तो सन्मान दिला असता, तर तोही पुरेसा होता. जो सन्मान त्यांना काँग्रेसमध्ये मिळाला नाही, तो सन्मान त्यांना त्यानंतर भाजपमध्ये मात्र सदैव मिळाला. त्यांच्या पद्धतीने काम करायचं स्वातंत्र्यही त्यांना मिळालं. आज भारतीय जनता पक्षाने त्यांना आसामचे मुख्यमंत्रीपद देऊन, त्यांचा अजून मोठा गौरव केला आहे..

अशा स्वाभिमानी, जिद्दी आणि राष्ट्रप्रेमी हिमांता बिस्वा सर्मा जी यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा…