Maharashtra

एक्झिट पोलचा अंदाज म्हणजे अंतिम निकाल नाही – नितीन गडकरी

By PCB Author

May 20, 2019

नागपूर, दि. २० (पीसीबी) – अभिनेता विवेक ओबेरॉय यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘पीएम मोदी’ या चित्रपटाच्या पोस्टरचे भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते  आज (सोमवार) प्रकाशन करण्यात आले. यावेळी गडकरी यांनी पत्रकारांशी बोलताना एक्झिट पोलवर प्रतिक्रिया दिली. एक्झिट पोलचा अंदाज म्हणजे अंतिम निकाल नाही, असे त्यांनी म्हटले आहे.  

गडकरी पुढे म्हणाले की, देशात पुन्हा एकदा भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल, पंतप्रधान मोदीच पुन्हा पंतप्रधान होतील, असा दावाही त्यांनी केला.  एक्झिट पोलचे अंदाज म्हणजे अंतिम निकाल नसले, तरी त्यातून काही संकेत मिळतात. एक्झिट पोलचा सर्व समावेशक विचार करता एक्झिट पोलच्या अंदाजाचे प्रतिबिंब निवडणूक निकालात पडत असतात, असे ते म्हणाले.

महाराष्ट्रातही २०१४ सारखेच निकाल लागतील, असेही   त्यांनी सांगितले.  पंतप्रधान पदाबाबत मी २० ते २५ वेळा स्पष्ट केले आहे. आम्ही मोदींच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढलो आहोत. त्यामुळे स्वाभाविकपणे तेच पंतप्रधान होतील, असे त्यांनी स्पष्ट केले. मोदी आणि त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेल्या कामावर जनता विश्वास दाखवला आहे, असेही  गडकरी यांनी सांगितले.