“एका नोटीसला इतका घाबरला संज्या कि…”

0
194

मुंबई,दि.२९(पीसीबी) – ‘माझ्याशी पंगा घेऊ नका. मी नंगा माणूस आहे’, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली होती. याच प्रतिक्रियेवरून माजी खासदार निलेश राणे यांनी संजय राऊत यांचा समाचार घेतला.

“संज्यासारखे भिकार मर्दानगीची वार्ता करतात यासारखं हास्यास्पद काही नाही. ज्यांनी आयुष्य एका खोलीत बसून काढलं तो मैदानात लढण्याची वार्ता करतो, मैदानात आल्यावर कळेल संज्याला ‘नागडं’ कशाला म्हणतात. मग म्हणतच बसावं लागेल ‘ मै नंगा हू’. एका नोटीसला इतका घाबरला संज्या.” याचसोबत, “शिवसैनिकांनी काही ठिकाणी पोस्टर लावले ‘आम्ही मागे लागलो तर तुम्हाला देश सोडावा लागेल’. देशाबाहेर नोकरी द्यायचा धंदा चालू केला की काय शिवसेनेने?? की देशाबाहेर लग्न लावून द्यायचं काम हाती घेतलं?? ह्या दोन व्यवसायांच्या मार्केटिंगसाठी हे वाक्य सॉलिड आहे”, असंही ट्विट करत त्यांनी शिवसेनेलाही कोपरखळी मारली.

दरम्यान, वर्षा राऊत यांना पीएमसी गैरव्यवहार प्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. ईडीसमोर हजर होण्यासाठी वर्षा राऊत यांनी ५ जानेवारीपर्यंत वेळ मागितला आहे. संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.