एकाने डॉक्टर बनायचे तर दूसऱ्याने पेशंट; हा तर शिवसेना-भाजपचा नेहमीचा खेळ- जितेंद्र आव्हाड

0
518

मुंबई, दि. २६ (पीसीबी) – एकाने डॉक्टर बनायचे तर दूसऱ्याने पेशंट. आमचं ठरलंय, बिघडलंय हा शिवसेना आणि भाजपचा नेहमीचा खेळ आहे. आता या प्रकाराला जनता फसणार नाही. इतकेच नव्हे तर, सत्ताधारी कोण आहेत, कसे आहेत, त्यांची वागणूक कशी आहे. हे माहित असल्याकारणाने फक्त अग्रलेखावरच समाधान मानावे, असा टोला राष्ट्रवादीचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेला लगावला आहे.

मुंबईत प्रसार माध्यमांशी आव्हाड बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्याआधी अफजलखानापासून ते शायिस्तेखानापर्यंत पटक देंगे, उखाड देंगे हे सगळ ऐकल्यानंतर जी काय मगरमिठी शिवसेना-भाजपने मारली, ती काय उभ्या आयुष्यात सुटणार नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

दरम्यान, लोकसभा निवडणुकी आधी शिवसेना- भाजप एकमेकांवर  टीकाटिप्पणी करत होते. निवडणूक स्वबळावर लढणार असल्याच्या घोषणाही दिल्या जात होत्या. मात्र, त्यांच्यात मनोमिलन झाले. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना -भाजप नेते मुख्यमंत्री आपलाचा होणार असल्याची   विधान करू लागले आहेत. यावर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी  निशाणा साधला आहे.