Maharashtra

एकाच कुटुंबातील चौघांची गळफास लावून आत्महत्या

By PCB Author

October 20, 2019

बेळगाव,  दि.२० (पीसीबी) – एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना  शनिवारी रात्री गोकाक तालुक्यातील होसुर गावात घडली आहे.

भिमाप्पा सिद्धप्पा चुनप्पगोळ (३०), मंजुळा चुनप्पगोळ (२५), प्रदीप (८) आणि मोहन (६) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, भिमाप्पा हे सिंडिकेट बँकेत गार्ड म्हणून काम करत होते. चुनप्पगोळ कुटुंबाचे प्रमुख भिमाप्पा यांना नैराश्याने ग्रासले होते. आत्महत्येमागे नेमके कारण कोणते याबाबत अजूनही समजू शकले नाही. भिमाप्पा चुनप्पोळ यांनी पहिल्यांदा आपल्या दोन्ही मुलांचा गळफास लावून त्यांचे जीवन संपवले. ते मृत झाल्याची खात्री पटल्यानंतर लगेचच भिमाप्पा यांनी आणि त्यांची पत्नी मंजुळा चुनप्पगोळ या दोघांनी फास घेत आपल्या जीवनानाची यात्रा संपवली. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी घटनास्थळी भेट दिली. गोकाक ग्रामीण पोलीस स्थानकात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास गोकाक पोलिस शोध घेत आहेत.