एकल पालकत्व समाजासाठी धोकादायक- चेन्नई उच्च न्यायालय

0
675

चेन्नई, दि. ११ (पीसीबी) – मुलांच्या संगोपनासाठी आई-वडील दोघेही गरजेचे आहेत. एकल पालकत्व हे मुलांच्या आरोग्यासाठी आणि समाजासाठी धोकादायक असल्याचे मत मद्रास हायकोर्टाने व्यक्त केले आहे.

केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या एका सचिवांविरोधातील अब्रुनुकसानीच्या याचिकेवर मद्रास हायकोर्टात सध्या सुनावणी सुरू आहे. ‘एकल पालकत्व हे लहान मुलांसाठी धोक्याचे असते. मुलांना आई आणि वडील दोघांच्याही प्रेमाची गरज असते. त्यांना जर कमी प्रेम मिळाले तर त्यांच्या वागणूकीत बदल होऊ शकतो. अशी मुले समाजविरोधी कृत्यांमध्ये सहभागी होण्याचा धोका असतो.’ असे मत न्या. एन. किरूबकरन यांनी व्यक्त केले आहे.

तसेच केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाचे विभाजन करावे असे मतही हायकोर्टाने व्यक्त केले. एक विभाग मुलांच्या लैंगिक शोषणाविरोधात काम करणारा तर दुसरा मुलांच्या विकासासाठी पाऊल उचलणारा असावा असा सल्लाही हायकोर्टाने दिला आहे.