एकनाथ खडसे यांच्यासह भाजपचे अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत – गुलाबराव पाटील

0
373

जळगाव,दि.२(पीसीबी) – शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. ते जळगावमध्ये माध्यमांशी बोलत होते.

गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्यासह भाजपचे अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत. किती नेते संपर्कात आहेत हे मात्र आज सांगू शकत नाही, असंही म्हटलं आहे. त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.

गुलाबराव पाटील यांनी जिल्हा परिषद निवडणुकीची पूर्ण तयारी झाल्याचं सांगत योग्य वेळी संख्याबळ सिद्ध करु, असं म्हटलं आहे. महाविकासआघाडीची बैठक झाली. जिल्हा परिषद निवडणुकीबाबत या बैठकीत चर्चा झाली. या निवडणुकीत आघाडीचाच उमेदवार असेल. निवडणुकीत आम्ही आमचं संख्याबळ सिद्ध करुन दाखवू, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.