Maharashtra

एकनाथ खडसेंना राज्यसभेची ऑफर

By PCB Author

March 07, 2020

मुंबई, दि.७ (पीसीबी) – एकनाथ खडसे यांच भूखंड घोटाळ्यात मंत्रिपद गेले. त्यानंतर पक्षाने त्यांना विधानसभेचे तिकीटही नाकारले होते. त्यामुळे नाराज झालेल्या खडसे यांनी उघड बंड करीत पक्ष सोडण्याचा इशारा दिला होता. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी पक्षाने त्यांना आता संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, नवी ऑफर देताना त्यांना राज्याच्या राजकारणापासून दूर ठेवण्याची पुरेपूर काळजी घेण्यात आल्याचंही बोलले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार व माजिद मेमन हे राज्यसभेतून निवृत्त होत आहेत. शरद पवार हे पुन्हा एकदा राज्यसभेवर जाणार आहेत. तर, मेमन यांच्या जागी फौजिया खान यांना संधी देण्यात आली आहे. काँग्रेस व शिवसेनेने अद्याप आपली नावे जाहीर केलेली नाहीत.