एकनाथ खडसेंना पक्षात घेण्याचे शिवसेनेचे प्रयत्न?

0
634

महाराष्ट्र, दि.६ (पीसीबी) – शिवसेना आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यातील छत्तीसचा आकडा माहीत असल्याने शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी भाजपने नारायण राणे यांना पक्षात प्रवेश दिला. शिवसेनेने डिवचण्याचा प्रयत्न केल्यास ‘नारायण अस्त्रा’चा वापर करण्याचे भाजपने ठरवले होते. मात्र, राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्याने भाजपची चांगलीच अडचण झाली आहे. विरोधी पक्ष बनलेली भाजप याचे उट्टे काढणार असल्याचे गृहित धरून त्यांच्या आरोपांमधील हवा काढण्यासाठी शिवसेनेने भाजपचे नेते एकनाथ खडसे यांना पक्षात घेता येईल का यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.