Maharashtra

एकनाथ खडसेंना धक्का; ‘या’ महिलेला देणार भाजप उमेदवारी

By PCB Author

October 02, 2019

मुंबई, दि. २ (पीसीबी) –  भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना पहिल्या यादीत उमेदवारी दिलेली नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली असताना आता त्यांना दुसऱ्या यादीतही स्थान देण्यात येणा नाही, असे सांगितले जात आहे. त्यामुळे खडसे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.  

दरम्यान, एकनाथ खडसे यांच्याऐवजी त्यांच्या कन्या रोहिनी खडसे यांना भाजप उमेदवारी देणार असल्याची माहिती आहे. रोहिणी खडसे सध्या जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा आहेत. जळगावच्या मुक्ताईनगर मतदारसंघातून त्यांची उमेदवारी अपेक्षित होती. मात्र त्यांच्याऐवजी त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, पहिल्या यादीत स्थान न मिळाल्याने खडसे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. भाजपचे गेली ४० वर्ष प्रामाणिकपणे काम करुनही आपल्याला असे का वागवण्यात आले, याबाबत मी विचारणार आहे. माझा काय गुन्हा आहे, ते तरी सांगावे. आपल्याविरोधात कोणी विष पसरवले याचीही विचारणा करणार  आहे, असे  खडसे यांनी म्हटले आहे.