एकनाथ खडसेंचे राज्य मंत्रिमंडळात पुनरागमन होणार?  

0
409

मुंबई, दि. १६ (पीसीबी) –  राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे भाजपाध्यक्ष अमित शहांची भेट घेण्यासाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. त्याआधी भाजपचे संघटन महामंत्री रामलाल यांच्यासोबत फडणवीस आणि दानवे यांनी दिल्लीतील लीला पॅलेस या हॉटेलमध्ये प्रदीर्घ चर्चा केल्याचे समजते. यावेळी शिवसेनेबरोबर जागावाटप, एकनाथ खडसेंच्या मंत्रिमंडळ समावेशाबाबत चर्चा झाल्याचे समजते.