Desh

एअर स्ट्राइक यशस्वी; भारतीय हवाई दलाकडून पुरावे सादर  

By PCB Author

March 06, 2019

नवी दिल्ली, दि. ६ (पीसीबी) – परदेशी प्रसारमाध्यमांनी एअर स्ट्राइकच्या यशस्वीतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. यावर भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राइकचे पुरावे केंद्र सरकारला सादर केले आहेत. या मोहीमेसाठी वापरण्यात आलेल्या ८० टक्के बॉम्बनी अचूक लक्ष्यभेद केला, असा दावा हवाई दलाने आपल्या अहवालात केला आहे. 

बॉम्ब लक्ष्यावर पडले नाहीत, हा दावा खोडून काढण्यासाठी हवाई दलाने एक फाईल तयार केली आहे. १२ पानी अहवालात उपग्रहाच्या मदतीने घेतलेले हाय रेसोल्युशन फोटो आणि एसएआर रडारच्या सहाय्याने घेण्यात आलेल्या फोटोंचा समावेश आहे. हे फोटो मोदी सरकारकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.

इंडियन एअर फोर्सच्या मिराज २००० विमानातून इस्त्रायली बनावटीचे स्पाइस २००० बॉम्ब टाकण्यात आले आहेत. हे बॉम्ब लक्ष्य असलेल्या इमारतीचे छप्पर तोडून आत पडले आणि आतमध्ये त्याचा स्फोट होऊन मोठे नुकसान झाले. त्यामुळे मोठे नुकसान आतमध्ये झाले आहे, असे सूत्रांकडून  सांगितले जात आहे.